१५ जानेवारी, २००९

जन्म हा कोरडा



मीच माझ्या घरी बेघरासारखा;
भग्न खोप्यातल्या पाखरासारखा.

घेरले सागरी वादळाने मला;
हाकतो नाव मी बेडरासारखा.

जीवना जाहला काय पाषाण तू;
देवळातील त्या ईश्वरासारखा.

फौज माझ्यापुढे संकटांची उभी; 
झुंजतो मी इथे संगरासारखा.

जन्म माझा कसा राहिला कोरडा;
पावसावाचुनी वावरासारखा.

हे निळाई मला पाज पान्हा तुझा;
हंबरू मी किती वासरासारखा.

-ललित सोनोने

1 टिप्पणी:

marathi gazal म्हणाले...

ललित काका,
तुमचि गझल वाचुन खुप आनंद झाला...
जीवना जाहला काय पाषाण तू
देवळातील त्या ईश्वरासारखा

वाह वा... सुंदरच..