२४ जानेवारी, २००९

उद्धार



भेटले स्वातंत्र्य आता दाटला अंधार येथे;
सोसतो माणूस जो तो रोज अत्याचार येथे.

लेखणी, पाटी हवी होती जिथे हातात ज्यांच्या;
पाहतो मी त्याच हाती बंदुका-तलवार येथे.

हाय माझे कुंपणाने शेत सारे फस्त केले;
मी कुणाची नोंदवू ,कोणाकडे तक्रार येथे.

देह विक्री कोणती वारांगना करते खुशीने?
भाकरीसाठी करावा लागतो व्यापार येथे.

एवढीही दुष्मनी ठेऊ नये की माणसाला;
अंत्यकाळी ना मिळावी माणसेही चार येथे.

संसदेच्या लाजल्या भिंतीच नोटा पाहताना;
खासदारांचा दिसे कोटीतला बाजार येथे.

जन्मभर नुसतेच माझे पाय जे ओढीत गेले;
मानले त्यांचेच मीही कैकदा आभार येथे.

दोष देणे सारखे नाही बरे दुस-या कुणाला;
आपला आपण कराया पाहिजे उद्धार येथे.


-गौरवकुमार आठवले

९४२३४७५३३६

1 टिप्पणी:

Gajanan S Ratale म्हणाले...

LALIT SIR.

MAMA GAZEL HA PRAKAR KHUP AAVADTO ANI MI TUMCHYA GAZEL PAPER LA PAN AANI DIWALI ANKAT KHUP WACHLYA AAHET KHUP CHAN LIHTAY TUMI ..