खोटे हसू, खोटे रडे, खोटीच ही संभाषणे
येथे जगावे लागते खोट्यांसवे खोटे जिणे
ह्यांच्या ख-या या नोक-या ह्यांचे खरे हे बंगले
ह्यांचे सुखाचे हुंदके... यांची गुलाबी भांडणे
हे गर्जती तेव्हा पडे न्हाणीघरांना काळजी
हे कुंथती तेव्हा बने ह्यांच्या चहाचे चांदणे
ते हेच ते सर्वज्ञ जे देती दिशेलाही दिशा
ह्यांच्याच व्याख्यांची उभी दाही दिशांना कुंपणे
प्रत्येक सत्त्याने जणू ह्यांची अनुज्ञा घेतली
प्रत्येक क्रांतीला करी संपूर्ण ह्यांचे भुंकणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा