Related Posts Plugin for WordPress, Blogger...

२७ सप्टेंबर, २००९

तीन गझला : वीरेंद्र बेडसेवीरेंद्र बेडसे
९४२१८८६०९२

१. वाट

पुन्हा जुने-नवे हिशेब मी किती करायचे?
जिवंत प्रश्न शेवटी तुला कसे भुलायचे?

दिव्या-दिव्यास लाभते हरेक ज्योत पेटती;
तुझ्याविना कशास मीच एकटा जळायचे?

उदास जिंदगी जरी,सखे नकोस घाबरू;
सनातनी बुरूज हे कधीतरी ढळायचे.

तमास भेदण्यास या नकोत चंद्र-तारका;
धरून एक काजवा पुढे-पुढेच जायचे.

निळ्या नभी भरारतात लक्ष-लक्ष पाखरे;
भरारणे असे तुला गडे कधी जमायचे?

कठीण वाट,बिकट वाट जीवना तुझी जरी;
पडायचे...उठायचे... जगावया झटायचे.

२.व्याख्या

टाळलेस तू मागे बघणे वळता-वळता;
ती नजरेची भेट राहिली घडता-घडता.

या मातीचा लळा असावा सूर्यालाही;
हिरमुसला तो,उदास झाला ढळता-ढळता.

हरला शर्यत ससा धुरंधर मला पटेना;
दिसली त्याला प्रिया असावी पळता-पळता.

वेड विलक्षण बघ रात्रीचे काजव्यासही;
नदीकिनारी सखी शोधतो जळता-जळता.

या प्रेमाच्या अन् प्रीतीच्या अनंत व्याख्या;
कळेल तुजला प्रेम काय ते कळता-कळता.

३.संकटे

तू मला पाहू नको,झुरतात आता संकटे;
वाट माझी अडवुनी बसतात आता संकटे.

संकटांना नाव नाही, गावचा पत्ता नसे;
वारसा शोधावया फिरतात आता संकटे.

दार केले बंद मी,पर्याय त्यांनी काढला;
कवडसा कवटाळुनी शिरतात आता संकटे.

बाजरी,ज्वारी,गहू आहेत हंगामी पिके;
बारमाही पण इथे पिकतात आता संकटे.

मानतो थोतांड मी पंचांग सारे अन् तिथ्या;
काळरेषेची दिशा रचतात आता संकटे.

हे खरे‘वीरेंद्र’पण तू ध्येयही सोडू नको;
झुंजण्याला जिद्दही भरतात आता संकटे.


गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP