Related Posts Plugin for WordPress, Blogger...

१३ नोव्हेंबर, २००९

सरगम : मधुरिका गडकरीविदर्भातील रसिले गझल गायक म्हणून श्री सुधाकरजी कदम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत़. मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरुपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे़. यवतमाळजवळील आर्णी येथील गांधर्व संगीत विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत़. त्यामुळे संगीत संवर्धनाचे, अध्यापनाचे त्यांचे कार्य अविरत सुरू असते़. संगीताची ओळख, जाण विद्यार्थ्यांना करून देतानाच गीतमंच, एक सूर एक ताल, कविता गायन वगैरे अनेक उपक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत. आणि हे सारे करता करताच खास विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक सुंदर स्वररचना तयार केल्या़. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमधून ही गाणी समूह स्वरुपात सादर होत असतात़.
‘सरगम’ ह्या पुस्तकात विद्यार्थ्यांना गाता येतील व सहज समजतील अशा सुलभ व मधुर स्वररचना श्री कदम ह्यांनी पेश केल्या आहेत़. मराठीतील नामवंत कवींच्या उत्तम काव्यरचनांना त्यांनी संगीतबध्द केले आहे़. तसेच या सर्व स्वरबद्ध गीतांना लिपीबद्ध करून पुस्तक रुपाने प्रकाशित केले आहे़. महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांनी प्रस्तुत रचना सरगम मार्गदर्शनानुरुप आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या. तर संपूर्ण संगीत जगतासाठी तो एक प्रशंसनिक उपक्रम ठरु शकेल हे निःसंशय ! ‘सरगमला’ प्रस्तावना देण्यात श्री यशवंत देव व पं. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही़. शब्दांची कुठलीही कंजुषी केलेली नाही़. परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते संलग्न व्यक्तीपर्यंत पोहचणे आवश्यक नव्हे तर अनिवार्य असते़. त्या बाबतीत मात्र संगीताच्या दुनियेतल्या मान्यवरांचे अपेक्षित सहकार्य मात्र सरगम प्रसारणासाठी लाभलेले नाही हे एक कटू सत्य आहे़. श्री सधाकरजी कदम यांची धडपड केवळ ‘सरगम’प्रकाशनापुरती नसून, ते पुस्तक संगीतोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे ही आहे़. अनेक जेष्ठ व श्रेष्ठ कवींच्या सुंदर व लोकप्रिय रचना निवडतांना त्यांची सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय पानोपानी येतो़ संपूर्ण गीता लिपीबध्द करताना वाद्यवृंदासाठी आवश्यक असलेल्या स्वरसमूहदेखील वेगवेगळा लिपीबध्द केलेला आहे़. एकूण, पाश्चात्य पध्दतीप्रमाणे ऑर्केस्ट्रा संचातील प्रत्येक वाद्यासाठी केलेली स्वतंत्र स्वरबध्दता त्यांनी या पुस्तकात वापरली आहे़. आज अगदी लहान-सहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवला जातो़. त्यामुळे संगीताची जुजबी ओळख विद्यार्थ्यांना करून देणे; त्यासाठी संगीत शिक्षकांना अतिशय उपयोगी ठरणारे असे हे पुस्तक आहे़ संगीत जगताच्या प्रथम पायरीवर पाऊल ठेवताना सर्वांसाठी आत मौलिक ठरणारी श्री सुधाकर कदमांची ही ‘सरगम’ आहे़.
‘सरगम’ निर्मिती विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत.धार्मिक, प्रांतिक व भाषिक विवादीत्व संपून त्यांची शक्ती राष्ट्र उभारणीच्या विधायक कार्यास लागावी या उच्च हेतूने केली असल्याचे श्री कदम ह्यांनी पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे़. महाराष्ट्रातील तमाम संगीत शिक्षकांनी ही गीते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली. तरच माझ्या प्रयत्नांचे चीज होणार आहे़. अन्यथा़ हे अंतरीच्या गाण्यातील उद्गारही ह्यात व्यक्त झालेले आहेत़. सरगम निर्मितीसाठी प्रोत्साहित करणार्‍या पं. जितेंद्र आभषेकींपासून संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे जे प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले. त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रस्तावनेत आहे़. ह्यावन सरगमची श्रेष्ठ मौलिकता सिध्द होते़ कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, गौतम सुत्रावे, वा़. गो़. मायदेव, द़. ना़ गवाणकर, गोविंद, शंकर बडे, वसंत बापट, संत तुकडोजी महाराज, बहिणाबाई चौधरी, विंदा करंदीकर, शिवा राऊत, यशवंत देव, मंगेश पाडगांवकर, गंगाधर महांबरे, शंकर वैद्य, कलीम खान, विजय देशमुख, गजेश तोंडरे, सौ़. मंगला पत्की, कृष्णराव भट्‌ट, नर्मदाप्रसाद खरे, रवी शुक्ल, इ़. नामवंत कवींच्या रचनांना संगीताच्या उपासकांनी, विद्यार्थ्यांनी अधिक लोकाभिमुख करावे म्हणून हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच. पण अनुकरणीयही़.
‘सरगम’ची मौलिकता फार मोठी आहे़. पण सरगमची खरी उपयुक्तता शाबीत होण्यासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील आधकार्‍यांची उदार मानसिकता व संपूर्ण सहकार्य सर्वार्थाने आवश्यक व अपेक्षित आहे़. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात आगामी सव्वीस जानेवारीपासून ह्या पुस्तकानुरुप विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयभावभक्तीयुक्त रचनांची ओळख व त्यांच्या फुलणार्‍या गायकीतून त्याचे प्रसारण झाल्यास ‘सरगम’ निर्मितीमागील लेखकाचा उद्देश संपूर्णतः फलद्रूप होऊ शकेल़. शिक्षण क्षेत्रातील व सांस्कृतिक क्षेत्रातील आधकार्‍यांनी सरगमची दखल खर्‍या अर्थाने घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी़ तसेच दृक-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शाळाशाळातून वितरीत करावी इतकाच मानस प्रस्तुत सरगम समीक्षा लेखनाचा आहे़. आर्णीसारख्या महानगरांपासून दूर असलेल्या ठिकाणच्या एका गुणी, विद्वान, मान्यवर संगीत प्राचार्यांच्या प्रस्तुत ‘सरगम’चे स्वागत व उपयोग तमाम रसिक व शासनासाठी एक फार मौलिक उपलब्धी आहे हेच खरे !

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP