१६ ऑक्टोबर, २०१०

दोन गझला : कमलाकर देसले



कमलाकर देसले
९४२१५०७४३४

१.पारदर्शी काच

मी दिव्याची पारदर्शी काच होतो .
काळजीच्या काजळीचा जाच होतो .

सभ्य जेंव्हा लाच घेतो पाहिले की-
सज्जनाला जीवघेणा जाच होतो .

जिंकता येते अधर्माने लढाई ;
मात्र जय युद्धात सत्याचाच होतो .

शंभराना मारण्यासाठी मुरारी ;
पांडवांच्याही रूपाने पाच होतो .

वाचली नव्हतीच गीता तोवरी मी ;
संत (?)म्हटले,"केवढा साधाच होतो"!


२.आळ

घातला पायात चाळ;
घेतला त्यांनीच आळ.

रे करूनी आत्महत्या;
जिंकता येतो न काळ .

आजचा नेता तरी हा;
जाहला घोटून लाळ.

आटले की प्रेम होते -
हे जिणे बाबा रटाळ.

पावतो का?देव भक्ता-
फक्त रे कुंटून टाळ.

धावतांना थांब थोडा;
रे गतीचा नियम पाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: