Related Posts Plugin for WordPress, Blogger...

३१ जुलै, २०११

पुछते है वो गालिब कौन है? : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

मैला तन तो धोया जाये, मैले मन को धोए कौन?
हँसता है जो सबके दु:खमे, उसके दु:खमे रोए कौन?
नरम मुलायम है बिस्तर पर नींद जरा भी आयेना
पत्थर को सिर्‍हाने लेकर, गहरी नींद मे सोए कौन?
सब मुझको अपने लगते है, सब मुझको अच्छे लगते है
मै भी सोचू मेरी नींद में ऐसे सपने बोए कौन?
ही दुसर्‍याचे दु:ख आपले समजून, तिला आपला शब्द देण्याची भावना - ही परपीडेची अनुभूती चांगला शायर, कवी होण्याची पहिली खूणगाठ आणि चांगला माणूस होण्याचीसुद्धा. आज आपण चर्चा करणार आहोत उर्दूमधील अशाच परदु:खाला आपले समजून त्याला शब्द देणार्‍या उर्दूमधील सर्वकालिक महान शायराविषयी. ज्याला उर्दू दुनिया 'गालिब' या नावाने ओळखते. 'गालिब'चे पूर्ण नाव मिर्झा असदुलाखॉं गालिब. 'गालिब' हा त्याचा तखलुस टोपणनाव म्हणजे 'विजेता'. आपल्या शायरीने सर्वांचे हृदय, अगदी वयाच्या २५ व्या वर्षीच जिंकणार्‍या या शायराचा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दु:खाशी, दारिद्रय़ाशी संघर्ष आयुष्यभर सुरू होता.

'पुछते है वो गालिब कौन है?
कोई बतलाये के हम बतलाये क्या?'

इतका स्वत:विषयीचा सार्थ अभिमान बाळगणारा शायर गालिबने उर्दू शायरीला 'मीरच्या' 'हुस्न इश्क'च्या प्रभावातून बाहेर काढले. जीवनाचे तत्त्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत गालिबने जगापुढे मांडले. गालिब फार मोठा तत्त्ववेत्ता नसला, तरी तो एक सजग माणूस होता. जीवनातील घडणार्‍या घटनांना केवळ मूकदर्शक बनून न पाहता त्यांना आपल्या भाषेत त्याने व्यक्त केले.कोई उम्मीद बर नही आती
कोई सुरत नजर नही आती।।
मौत का एकदिन मुअय्यन१ है

नींद क्यू रातभर नही आती।।
आगे आती थी हाले दिलपे हंसी
अब किसी बातपर नही आती।।
काबा किस मुँहसे जाओंगे गालिब
शर्म तुमको मगर नही आती।।
(१-नक्की)
गालिबचे पूर्ण आयुष्य क्रांतिकारी विचारांचे. तो निधर्मी वृत्तीचा होता. पूजा, कर्मकांड, प्रार्थना, नमाज यावर त्याचा विश्‍वास नव्हता आणि म्हणूनच तो कदाचित म्हणत असावा.
'काबा किस मुँह से जाओंगे गालिब?'
गालिबच्या कर्जबाजारीपणामुळे दिल्लीच्या एका पडक्या कोठीत गालिबचे वास्तव्य. त्याचे वर्णन वाचताना जाणवते. सायंकाळची वेळ. सूर्य अस्ताला गेला आणि गझलेच्या या सूर्याचा उदय झाला. अंधार हळूहळू या छोट्याशा घरात आपले हातपाय पसरवित आहे आणि एक छोटीशी मेणबत्ती आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने त्या अंधाराचा मुकाबला करीत आहे. मध्येच बकर्‍यांचा ओरडण्याचा आवाज येतो आहे आणि त्या सोबतच येतो आवाज- वाह वाहचा- गझल सुरू आहे.
'हरेक बात पे कहते हो तुम, के तु क्या है
तुम्ही कहो कि ये अन्दाजे गुफ्तगू क्या है?
रंगोमें दोडते फिरने के हम नही कायल
जब आँखही से न टपके, तो फिर लहू क्या है?'

माझ्याशी प्रत्येक वेळेस बोलताना तू म्हणतोस तू काय आहेस? तुझी बिशाद काय? मित्रा मला सांग की संवाद साधण्याची ही कुठली तर्‍हा आहे? दुसरा शेर गालिबचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगणारा आहे. गालिबच्या काळात ब्रिटीशांची जुलमी राजवट सुरू झाली होती आणि त्या काळातच गालिब लिहितो 'केवळ धमण्यातून जे वाहतं त्याला आम्ही रक्त म्हणत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी जर हे रक्त तुमच्या डोळ्यातून अंगार म्हणून बरसणार नसेल त्याला रक्त का म्हणावं?
गालिब त्याच्या शायरीमुळे अल्पावधीत संपूर्ण उर्दू विश्‍वामध्ये प्रसिद्ध झाला. परंतु येथे नमूद करण्यासारखे आहे की, त्याच्या एकूणच उर्दू गझल २३५ च्या आसपास असतील. त्या गझलच्या लोकप्रियतेवरच गालिब गझल सम्राट झाले. गालिबच्या गझलांचा प्रवास जीवनाच्या अखेरपर्यंत सुरूच होता. त्यासोबतच सुरू होता त्या परिस्थितीशी संघर्ष तो म्हणतो.

इब्ने मरियम हुआ करे कोई
मेरे दुख की दवा करे कोई।।

येशू ख्रिस्ताने ज्याला रोगमुक्त करायचे ते खुशाल करावे परंतु माझा रोग जो कुणी दूर करेल तोच माझ्यासाठी o्रेष्ठ आहे.

न सुनो गर बुरा कहे कोई
न करो गर बुरा करे कोई।।
रोकलो गर गलत चले कोई
बख्श तो गर खता करे कोई।।
जीवनाचे तत्त्वज्ञान अशा सोप्या भाषेत मांडणारा गालिब म्हणून आपल्या समकालीन शायर दाग, मोमिन, जॉक यांच्या तुलनेत वेगळा ठरला आणि त्याची शायरी लोकांना खूप आवडली. हुस्न, इश्क या पेक्षाही गालिबने उत्कटता, मानवी नाते संबंध, मानवी स्वार्थ, दु:ख, नैराश्य यांनाच गझलेचे विषय केले. सर्व असूनही मानवी जीव अतृप्त कसे यावर त्याचे हे अप्रतिम शेर.
'हजारो रब्बाहिशें ऐसी की हर रब्याहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकीन फिर भी कम निकले।।
मुहब्बत मे नही है फर्क जीने और मरने का

उसीको देखकर जीते है जिस काफिर पे दम निकले।।
कहॉ मयखाने का दरवाजा गालिब और कहाँ वाईज
पर इतना जानते है, कल वो आता था की हम निकले।।


गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP