३१ जुलै, २०११

..हम भूल गये हो तुझे ऐसा भी नही : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

प्रिय रसिक,

एक मुद्दत से तेरी याद भी ना आई हमे
और हम भूल गये हो तुझे ऐसा भी नही


गझल उर्दू, हिन्दी, मराठी भाषेतील एक लोकप्रिय काव्यप्रकार. गझल पार्शियन व अरबी भाषेतून उर्दूमध्ये आली. 'गझल' चा अर्थ होतो - स्त्री वा स्त्रीच्या सौंदर्याविषयी चर्चा करणे. प्रख्यात शायर फिराक गोरखपुरी म्हणतात, 'एखादा निर्दय शिकारी आपल्या शिकारी कुत्र्यासोबत एखाद्या हरणाचा पाठलाग करत असताना, पळता पळता ते हरिण एखाद्या झाडामध्ये कुंपनामध्ये फसते त्याच वेळी शिकार्‍याचा बान त्याचा वेध घेते आणि त्याच कंठातून जो करूण स्वर बाहेर पडतो तो म्हणजे गझल' म्हणजे स्त्री ही कारुण्याचं, प्रेमाचं प्रतीक; तशीच गझल.
गझलचा हा रोमहर्षक इतिहास आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला जाणवतो उर्दू गझल लोकप्रिय होण्यामागे तिची 'नजाकत'. त्या भाषेतील मार्दव आपल्याला मोहीत करते.

'हुजुर मै आपके दौलतकदेपे (घरी)

हाजिर हो जाऊंगा'
आप कब मेरे गरिब खाने पे

तशरिफ ला रहे हो?

घर या एकाच वास्तूला उर्दूमध्ये दोन वेगवेगळे विशेषणांनी संबोधल्यामुळे त्याची नजाकत आणखीच वाढते. अमीर खुसरो (१२५0-१३२५ इ.) या कविला उर्दू शायरीचा जनक मानतात.

त्याच्या आधी हिन्दी कवी संस्कृत, पाकृत बनभाषेत काव्यरचना करायचे. खुसरोंचे स्वागत कबीर, जायसी ग्रहिम यांनी मन:पूर्वक केले. मात्र, जवळजवळ ४00वर्षांनी वलीदकनी या कवीने अरेबिक आणि पर्शियन यांच्या भाषास मुलामा लावून 'रेख्ता' ही भाषा आणली. तिलाच आपण उर्दू म्हणतो.

ही भाषा साफसुदरी असल्यामुळे वलीची शायरी लोकप्रिय झाली; परंतु उर्दूचा पहिला 'साहेब-ए-दिवान' (त्याचे उर्दू भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले आहे.) शायर होण्याचा मान जातो हैद्राबादचा कुली कुतबशाह.
परंतु उर्दू भाषेच्या सुवर्ण काळाचा शायर होण्याचा मान जातो दोन प्रमुख शायर मीर तकी मीर आणि सौदा.
परंतु मीर तकी 'मीर' हा या काळातील लब्ध प्रतिष्ठित शायर -
मीरचा कालखंड १७२२ ते १८१0 (लखनौ) येथे मीरच्या १८३९ गझला किमान १४ हजार शेर वास्तव्य प्रसिद्ध आहेत. १३ पुस्तके १0३ रुबाईया (कसीदे) असा भरपूर काव्यप्रपंच मीर तकी मीरने आपल्या आयुष्यात केला. 'मीर' हा त्याचा तखलुस (टोपननाव) त्याचा अर्थ होतो लिडर - नेतृत्व करणारा.
मीरची शायरी आपल्या कालखंडामध्ये उर्दू गझलचे नेतृत्व करणारी होती. म्हणूनच त्यांच्याविषयी डॉ.उर्मीलेश म्हणतात,

हमपर गम का परबत टूटा

तब हमने दो चार कहे
उस पर भला क्या बिती होगी,

जिसने शेर हजार कहे

दिल आणि दिल्ली र्मसिया (शोकगीत गाणारा) मीर त्यामुळेच उर्दू शायरीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जातो.

देख तो दिल की जाँ से उठता है
ये दुआँ तो कहाँ से उठता है


मीरची सर्वकालीक श्रेष्ठ गझल ज्यामुळे लोक 'मीरला' 'मीर' म्हणून ओळखायला लागले ती गझल आहे.

हस्ती अपनी हुबाब कीसी है
ये नुमाइश सराबकी सी है ।।
नाजुकी उसके लब की क्या कहि ये
पंखुडी इक गुलाब की सी है ।।
मै जो बोला कहा की ये आवाज
उसी खाना खराब की सी है ।।
बार बार उसके दर पे जाता हुँ
हालत अब इज्तीराब किसी है
'मीर' उन नीम बाज आंखोमे
सारी मस्ती शराब किसी है।।

गझलचा प्रत्येक शेर ही जणू स्वतंत्र कविताच असते. पहिल्या शेरमध्ये मीर म्हणतो,
माझे जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आणि माझ्या भोवतालचे वातावरण मृगजळासारखे आहे.
मधले दोन शेर समजायला अगदी सोपे असले तरी सोप्या भाषेमध्ये ही नजाकत उर्दूमध्ये मांडणे हीच मीरची कमाल होती. चवथ्या शेरामध्ये इज्तीराब म्हणजे व्याकुळता आहे.
'कि सी है' ही रदीफ आहे. प्रत्येक गझलमध्ये रदीफ एकच असतो. तो कधीच बदलत नसतो. रदीफ हा आरेबीक शब्द आहे. त्याचआधी घोडा किंवा उंटावर आरुढ झालेल्या स्वारामागे बसलेली व्यक्ती अथवा काफीया नंतर येणारा शब्द म्हणजे रदीफ.
या गझलमध्ये हुबाब, शराब, शबाब, इज्तिराब हे काफीये आहेत. काफीया म्हणजे पुन्हा पुन्हा येणारा शब्द यात जाचा स्वर कायम असतो.
या गझलविषयी भाष्य करताना प्रख्यात उर्दू समीक्षक डॉ.महेबुब राही म्हणतात, मीरनंतर 'कि सी है' रदीफ वापरुन कुठल्याही शायराला अशी गझल लिहिता आली नाही. इतकी ही गझल अप्रतिम आहे. म्हणूनच कवि श्रेष्ठ गालिब म्हणतो,

'रेख्ता के (उर्दू के) तुमही उस्ताद नही हो

गालीब कहते है
अगले जमाने मे कोइ मीर भी था ।।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: