१.
उत्तर
पुरे तुझा हा रडवेला स्वर;
चल जगण्याशी दोन हात कर!
तुझे नि माझे जमणे नाही;
जा बाई तू मला माफ कर.
दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर.
मीही मित्रा ध्यास घेतला;
कितीक करशील माझा वापर?
रानफुले शिकतात उन्हातच;
कुठली शाळा? कुठले दप्तर?
आता असतील प्रश्नही माझे
हवे तसे मी देईन उत्तर.
२.
उदास,खाली मनास घेऊन फिरतो आम्ही
उदास,खाली मनास घेऊन फिरतो आम्ही;
माहीत नाही कोणासाठी झुरतो आम्ही.
लाट ऊसळते परीस्थितीची एकाएकी;
कसेबसे मग प्राणपणाने तरतो आम्ही.
दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे;
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही.
साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे;
कधी कधी मग असे एकटे उरतो आम्ही.
कळावयाच्या आत संपते सगळे काही;
सरणावरती संथ गतीने सरतो आम्ही.
ab.shirsat@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा