७ ऑक्टोबर, २०११

प्रफुल्ल कुळकर्णी : एक गझल









किती हेच सांगू



किती हेच सांगू , अता सारखे;
मुलीला जपूया मुला सारखे.

मनासारखे ना मिळाले तुला;
कुणा सांग लाभे मनासारखे?

कसे ओळखावे तुला जीवना;
तुझे भास ओल्या धुरासारखे.

तिची याद येताच जादूभरी;
मला दु:ख वाटे सुखासारखे.

अकालीच प्रौढत्व आले मला;
जरी वागणे लेकरासारखे.


  • prafull.gazal@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: