प्रिय रसिक,
गझल का शेर बनता है, रुबाई याद आती है, कभी तनहाई मे जब भी, तुम्हारी याद आती है।। पुराने लफ्ज होकर भी, नये मानी १ निकलते है तुम्हारे खत को पढकर जब पुरानी याद आती है। (१-अर्थ) ज्या काळात कविo्रेष्ठ गालिब आपल्या दारिद्रय़ाशी, दु:खाशी संघर्ष करीत उर्दू गझलमध्ये दर्शिनीकता, जीवनाचे सरळसाधे तत्त्वज्ञान मांडत होता त्याच काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात वास्तव्य करीत असणारा एक शायर आपल्या शाही, विलासी थाटाचा पुरेपुर उपभोग घेत उर्दू गझलमध्ये प्रेम, इश्क, सौंदर्य याचीच उधळण करीत होता. या शायराचे नाव होते 'दाग'. साधी सरळ योजना, मनाला भिडणारी, भावणारी शायरी हे दागचे वैशिष्ट्य.- फिल में फरहत (खुशी) जो कभी आती है अपने रोने पे हंसी आती है।। क्या है गिनती मेरे अरमानों की फौजकी फौज चली आती है।। दाग यांचा जन्म दिल्लीच्या चांदणी चौक भागात २५ मे १८३१ ला झाला. दागचे पूर्ण नाव मिर्झा खाँ शमसुद्दीन खाँ. दाग ज्या वेळेस फक्त सहा वर्षांचा होता, त्यावेळी एका इंग्रज अधिकार्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दागच्या वडिलांना फाशीची शिक्षा झाली आणि 'दाग' पोरका झाला; परंतु दागची आई अतिशय सुंदर असल्यामुळे आखरी मुघल बादशाह बहादुर शाह जफरचा युवराज मिर्झा फखरू याने तिच्या सोबत 'निकाह' केला व आईसोबत दागही लाल किल्ल्यात आला आणि दागचे जीवनच बदलले. वयाच्या १५-१६ व्या वर्षीच महालातील शेरोशायरी, महफिलीत 'जौक' या उस्तादाच्या मार्गदर्शनाखाली दागच्या शायरीचा प्रवास सुरू झाला. ज्या व्यक्तीला, रोजी रोटी, दारिद्रय़, दु:ख या विवंचनाच नाहीत. ज्याने वयाच्या २५ व्या वषार्ंपर्यंत दु:ख पाहिले नाही, त्याची शायरी oुंगार, लावण्य, मादकता याचेच वर्णन करणारी होऊ घातली तर त्यात आश्चर्य वाटायला नको आणि तसेच झाले. दाग अशा गझला लिहिण्यात निपून झाले. बुताने माहवश १ उजडी हुई मंजिल मे रहते है जिसी की जान लेते है, उसी के दिल में रहते है।। हजारों हसरतें ऐसी, की रोके से नही रूकती बहुत अरमान ऐसे है, की दिल के दिल में रहते है।। कोई नामो निशा पुछे तो ऐ कासिद बता देना तखल्लुस २ 'दाग' है और आशिको के दिलमे रहते है।। (१ रूपवान सुंदर स्त्रियां) २ तखल्लुस-टोपणनाव. दागच्या शायरीच्या प्रभावाखाली त्यांच्या शागिर्दांची फौजच्या फौज तयार झाली. नवाब साइल देहलवी, बेखुद देहलवी, आगा देहलवी, सीमाब अकबराबादी, साहिर होशियारपुरी; परंतु दागचा सर्वात प्रसिद्ध शिष्य (शागिर्द) म्हणून उदयास आले- 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा' लिहिणारे- डॉ.अल्लामा इकबाल. दागच्या प्रभावामुळे उर्दू जगत त्या काळी दोन भागात विभागले गेले- 'गालिब स्कूल' आणि 'दाग स्कूल' गालिबच्या प्रभावाखाली मानवी दु:ख, भावभावना, समाज हे शायरीचे विषय होते तर दागच्या गझलमध्ये हुस्न इश्क शबाब याचा उल्लेख असायचा; परंतु १८५७ चा उठाव झाला आणि इंग्रजांनी दागच्या वडिलांची म्हणजे बादशहाच्या पुत्राची हत्या केली आणि दागला लाल किल्ला सोडावा लागला. ऐशोआरामाचे दिवस गेले. मग रामपूर, लाहोर, अमृतसर, अजमेर, आग्रा असा प्रवास सुरू झाला आणि शेवटी दाग हैद्राबाद येथे आले व निजामाचे उस्ताद म्हणून स्थिरावले. त्या काळात गझल लेखन सुरूच होते. तेथेच १९0५ मध्ये हा शायर इहलोक सोडून गेला आणि आपल्या मागे सोडून गेला आपल्या सौंदर्यप्रचुर, साध्या-सरळ गझलाचे एक महाविश्व. दाग आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय शायर होते आणि सर्वात o्रीमंतही. उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळविणे कठीण आणि त्यात शायरी करणे आणखीच धीराचे, संयमाचे काम. म्हणूनच दाग लिहितात. 'सुनाने के काबिल जो थी बात उनको वही रह गई दर मिया आते आते नही है खेल ऐ 'दाग' यारो से कहदो के आती है उर्दू जुबा आते आते।। |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा