३१ जुलै, २०११

तुझे ऐ जिन्दगी हम दूर से पहचान लेते है : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'

प्रिय रसिक,

मानवी समाजाच्या इतिहासात व मानवी संस्कृतीच्या उत्थानात एकाच उदात्त ध्येयासाठी संपूर्ण मानवजात एकत्र झाल्याची उदाहरणे फार कमी आहेत. कधी धर्माच्या, कधी जातीच्या, कधी वंशाच्या तर कधी प्रांत आणि देशाच्या नावांवर माणसं वाटली गेली, विभागली गेली, मारली गेली, हे सर्वo्रुत आहेच. त्याला भाषाही अपवाद नाही. आपल्या स्वार्थासाठी उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे, असा खोडसाळ प्रचार मुद्दाम करण्यात आला. परंतु संस्कृत आणि उर्दू हय़ा दोन प्राचीनतम भारतीय भाषा आहेत. हे जाणकारांच्या, साहित्यिकांच्या लक्षात आले. उर्दू गझलची नजाकत, सौंदर्य, शब्दभंडार जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. त्यामुळेच मुस्लीम शायरांसोबत गैर मुस्लीम शायरांनीही आपल्या भावभावना उर्दू गझलमध्ये व्यक्त करण्यास सुरुवात केली. हे करतानाच त्यांनी आपला धर्म, आपली संस्कृती याचेही भान आणि जाण गझलमध्ये व्यक्त केली आहे. येथे हे नमूद करणे अत्यंत आवश्यक वाटते की उर्दू भाषेच्या शब्द सौंदर्यावर, तिच्या प्रगल्भतेवर मुस्लीम आणि हिंदू शायरच नव्हे तर सर्व सृजनकार आपले मतभेद विसरून एकत्र होताना दिसतात. या हिंदू शायरांची यादी फार मोठी नसली तरी त्या काळात त्यांच्या गझलेने उर्दू साहित्यात मोलाची भर टाकली.
पंडित ब्रीजनारायण 'चकबस्त' कुंवर महेंद्रसिंह बेदी सहर, रामप्रसाद बिस्मील, बालकवी बैरागी, रघुपती सहायं फिराक, नरेशकुमार शाद, प्रो. जगन्नाथ आझाद ही स्वांतत्र्यपूर्व काळातील शायरांची यादी. स्वातंत्र्यानंतर यात भर पडली. राजेंद्रनाथ 'रहबर', अशोक साहिल, दिनेश दर्पण, देवेंद्र काफीर, उद्धव महाजन 'बिस्मील', लता हया, प्रीती बाजपायी, अतुल अजनबी आणि खाकसार डॉ. गणेश गायकवाड आगाज ही मंडळी सध्या उर्दू गझलमध्ये रंग भरीत आहे.
परंतु उर्दू गझल सर्वात सुंदर, जास्त लोकाभिमुख, जास्त नाजुक करण्याचा मान जातो प्रख्यात शायर फिराक गोखपुरी यांना 'महाकवी' या नामाभिधानाने गौरवित, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त शायर फिराक गोरखपुरी यांना गालिब आणि इकबालनंतर सर्वात जास्त प्रतिष्ठा लाभली. 'फिराक'ची शायरी म्हणजे हिंदू मायथौलॉजी, भारतीय संस्कृती, अध्यात्म यांचा सुरेख संगम ते लिहितात.


गझल है या कोई देवी खडी है लट छिटकाये
ये किसने गेसू ये उर्दू को यूँ संवारा है।।
हर एक ऑख के आंसू है अपनी पलको में
हर एक सीने में जो दर्द है हमारा है।।
(१ उर्दूचा केशसंभार)

फिराक गोरखपुरी यांचे संपूर्णनाव रघुपती सहाय हे होते. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे १८९६ मध्ये झाला. 'फिराक' हे त्यांचे टोपण नाव आणि ज्या शहरातून ते आले. गोरखपूर म्हणून फिराक गोरखपुरी. फिराक उच्च विद्याविभूषित व संस्कृतचे प्रकांड पंडित होते. परंतु त्याच सोबत उर्दू, फारसी भाषेचाही अभ्यास केला. त्याच वेळेस त्यांना प्रख्यात साहित्यिकार मुंशी प्रेमचंद यांचे सान्निध्य लाभले. त्याच सोबत एच जी वेल्स, बर्नार्डशॉ, रोमारोला या पाश्‍चात्य लेखकांचे वाचन सुरूच होते आणि मग गझल लेखन सुरू झाले. त्यांच्या शायरीमध्ये वैश्‍विक अनुभूती आली.

बहुत पहले से इन कदमो की आहट जान लेते है
तुझे ऐ जिन्दगी हम दूर से पहचान लेते है।।

जिसे कहती है दुनिया कामयाबी, पता है हमको
उन्हे किन किमतों पर कामयाब इनसान लेते है।।

तबीयत अपनी घबराती है जब सुनसान रातों मे
हम ऐसे में तेरे यादो की चादर तान लेते है।।

तुझे घाटा न होने देंगे कारोंबारे उल्फत में
हम अपने सर तेरा ऐ दोस्त हर नुकसान लेते है।।

फिराक यांच्या शायरीमध्ये रिवायती किवा परंपरागत फॉर्मचा वापर करूनसुद्धा भारतीय मातीचा सुगंध, भारतीय संस्कृती याचा पुरेपूर परिचय येतो. १९७१ मध्ये जेव्हा फिराक यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला. त्यावेळी प्रख्यात समीक्षक रमेशचंद द्विवेदी म्हणतात, भारतीय संस्कृती करुणा, विरह, वेदना यांचा संगम म्हणजे फिराकची शायरी.
फिराक म्हणतात.


'किसी का यूँ तो हुआ कौन उम्रभर भी
ये हुस्नो इश्क तो धोका है सब मगर फिर भी
हजार बार जमाना इधर से गुजरा है
नई नई सी है कुछ तेरी रह गुजर फिर भी ।।

मानवी जीवनाची क्षणभंगुरता, विफलता, आनंद-दु:ख या सर्व भावना फिराकच्या गझलमध्ये वाचावयास मिळतात.


सितारो सें उलझलाता जा रहा हूँ
शबे फुर्कत १ बहुत घबरा रहा हूँ।

तेरे गम से दिल बहला रहा हूँ
जहाँ को भी समझता जा रहा हूँ।

जो उलझी थी कभी आदम के हाथो
वो गुत्थी आजतक सुलझा रहा हूँ।

मूहब्बत अब मुहब्बत हो चली है
तुझे कुछ भूल ता सा जा रहा हूँ।

भारतीय काव्यजीवनाला नवी चेतना देणारा शायर, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आवडता शायर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त शायर, असे अनेक सन्मान मिळवणार्‍या या शायराचे सर्वात मोठे योगदान हे आहे की त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: