Related Posts Plugin for WordPress, Blogger...

१४ ऑगस्ट, २०११

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'प्रिय रसिक,
उद्या भारतीय स्वातंत्र्याचा ६४ वा वर्धापन दिन. या शुभप्रसंगाच्या 'लोकमत'च्या तमाम वाचकांना हार्दिक शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पारतंत्र्याच्या बेड्या गळून पडल्या. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांनी ब्रिटीश साम्राज्याला जबरदस्त धक्का दिला होता. त्या उठावापासून ९0 वर्षेपर्यंत चाललेला स्वातंत्र्याचा लढा हिंसक आंदोलनापासून अहिंसक सत्याग्रहापर्यंत विविध वळणांवर भारतीय जनतेने अनुभवला. संपूर्ण भारत एक झालेला सार्‍या जगाने पाहिला. या स्वातंत्र्यसंग्रामाचे आणखी एक आगळे वेगळे वैशिष्ट्ये हे होते की, भारतीय जनमानसाच्या भावना चेतविण्याचे काम त्या काळात 'उर्दू गझल'नेही केले. 'इन्कलाब जिन्दाबाद' हा नारा उर्दूने आम्हाला दिला.
उर्दू गझल जी कधी लखनौच्या नवाबांच्या दरबारात संगीताच्या ठेक्यावर ताल धरणारी व नृत्य सादर करणारी उमराव जान 'अदा' व मुन्नीबाई'हिजाब' होती. ती गझल जेव्हा क्रांतिकारकांच्या हृदयातून लेखनीतून बाहेर पडली. तेव्हा ती रजिया सुलतानची तलवार व राणी लक्ष्मीबाईचा स्वाभिमानाचा पेहराव लेऊन जनमानसात अवतीर्ण झाली. आपल्या मादक व सुमधूर आवाजाने विलासी राजांना व नवाबांना खूश करण्याचा प्रयत्न करणारी गझल जेव्हा क्रांतिकारकांच्या शब्दांत तावून सुलाखून निघाली, तेव्हा ती असा एक 'तीर' बनून आली. जिने ब्रिटीश साम्राज्याचे कठोर काळीज छिन्नविछिन्न करून टाकले.
अशा क्रांतिकारकांपैकीच एक होते रामप्रसाद बिस्मील. ९ ऑगस्ट १९२५ मध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला आणि इतर क्रांतिकारकांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी पैसा उभा करण्यासाठी काकोरी जवळ रेल्वे गाडी थांबवून सरकारी खजिना लुटला. त्यातील रामप्रसाद बिस्मिल हा २६ वर्षाचा तरुण उर्दूचा मान्यवर शायर व अचाट प्रतिभेचा हिन्दी कवी होता. साक्ष द्यायला त्यांची ही गझल पुरेसी आहे.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजू ऐ कातिल में है।।
ए शहिदे मुल्क व मिल्लत में तरे उपर निसार
अब तेरी हिम्मत के चर्चे गैर की महफिल में है।।
जिस्म वो क्या जिस्म है, जिसमें न हो जोशे जुनून
क्या लडे तूफान से वो कश्ती जो साहिल में है।।
वक्त आने पे बता देंगे तुझे ए आसमा
हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है।

तुरुंगात डांबल्यावर रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर ब्रिटीशांनी अमानुष अत्याचार केले. त्या वेळेस त्यांना ते सहन करण्याचे धैर्य त्यांच्या गझलनेच दिले. १९ डिसेंबर १९२७ ला या क्रांतिकारकाला गोरखपूरच्या तुरुगांत फाशी देण्यात आली. १८ तारखेला तुरुगांत जेव्हा त्यांना त्यांची आई भेटावयास आली. आईला भेटताना त्यांच्या डोळय़ात अo्रू आले. आई धिराची देवता होती.
ती रामप्रसादला म्हणाली, 'बेटा राम, हरिश्‍चंद्र, दधिची या तुझ्या पूर्वजांप्रमाणे तू सुद्धा वीरत्व, धर्म व देश यासाठी प्राण दे. चिंता आणि पश्‍चाताप करण्याची अजिबात गरज नाही', 'पण आई आगीजवळ ठेवलेले तूप विरघळतेच ना. तुझे अन् माझे नातेही तसेच आहे. तू जवळ येताच माझ्या डोळय़ात अo्रू दाटून आले अन्यथा मी फार आनंदी आहे' फाशीसाठी घेऊन जात असतानाही त्यांनी मोठय़ाने वंदे मातरम् म्हटले आणि ही गझल म्हटली.
मालिक तेरे रजा रहे और तू ही तू रहे
बाकी मै रहू न मेरी आरजू रहे ।।
जब तक कि तन में जान रगों में लहू रहे
तेराही जिक्रे यार तेरी जुस्तजू रहे ।।

फाशीच्या तख्तावर उभे राहून ते म्हणाले
"I wish the downfall of the British Empire"
नंतर हा शेर म्हटला.
'अब न अहले वल वले है और न अरमानो की भीड
एक मिट जाने की हसरत अब दिले बिस्मिल में है।

म्हणजे मनामध्ये आता कसलाच कल्लोळ नाही. इच्छा, न आकांक्षा आता फक्त हृदयात केवळ एकच आस आहे, प्राण त्यागाची.पत्थराच्याही काळजाला पाझर फोडणारे क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यासाठीचे हे बलिदान ऐकून डोळे पाणावतात. पुढे आपण स्वतंत्र झालो. परंतु ज्या उदात्त ध्येयासाठी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले गेले. ते पहिल्या पाच-दहा वर्षातच धुळीस मिळताना दिसले. सृजनकार साहित्यकारांचा भ्रमनिरास झाला. प्रगतिशील आंदोलनाचा उदय हा त्याचाच परिपाक होता. त्या प्रगतिशील आंदोलनाचे तीन महत्त्वाचे अध्वयरू होते. अली सरकार जाफरी, जनिसार अख्तर आणि साहिर लुधयानवी या तिघांनी शोषितांचा, वंचितांच्या पीडितांच्या भावना बोलून दाखवल्या.
कविता, गझल, रुबाई प्रत्येक शेरामध्ये त्यांनी हे व्यक्त केले.
अली सरदार जाफरी हे सर्वांत ज्येष्ठ प्रगतिशील शायर, स्वातंत्र्यानंतरचे उद्विग्न करणारे वातावरण बघून त्यांनी लिहिले.
मेरे हाथ से मेरा कलम छीनलो
और मुझे एक बन्दूक देदो
मैं तुम्हारी सफो में तुम्हारी तरह
अपने दुश्मन से लडने चलूँगा ।

स्वातंत्र्य मिळाले, पण कुणाला, कशासाठी. त्यांची ही कविता आपणास विचार करावयास लावते.
कौन आजाद हुआ?
किसके माथे से गुलामी की सिहायी छुटी?
मेरे सीने में अब भी दर्द है महकूमीा

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP