४ सप्टेंबर, २०११

'दुख ने मेरे घर का रस्ता देख लिया है' : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'


प्रिय रसिक,

'बहुत कठीण हुआ इन दिनो गझल कहना
लहु में डुबे हुये चांदको कंवल कहना।।
बहुतसे लोग है दुनिया में जिनका कोई नही
उन्ही के वास्ते भी तुम कोई गझल कहना।।


अशा लोकांसाठी गझल लिहणे हे खर्‍या शायराचे कर्तव्य! आतापर्यंत आपण शायरांच्या गझल वाचल्यात; परंतु आज आपण एका पाकिस्तानी स्त्री (शायरा) गझलकाराला भेटणार आहोत. जिची गझल संपूर्ण स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करणारी गझल आहे. तिचे नाव होते परवीन शाकीर. आज भारत पाकिस्तानमध्ये स्त्री शायरांची फार मोठी फेहरीस्त आहे. नुजहत अन्जुम, शमीना अदीब, अन्जुम रहबर, लात हया, प्रीती वाजपायी ह्या सर्व शायरा जिला आपला आदर्श मानतात अशी परवीन शाकीर. तिचा जन्म २४ नोव्हेंबर १९४२ ला कराची येथे झाला. परवीन पुढे एम.ए. (इंग्रजी वाड्मय) झाली. अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. केल्यावर परवीन इस्लामाबाद येथे कस्टम खात्यामध्ये कलेक्टर म्हणून जॉईन झाली. गझल लेखन कॉलेज लाईफपासूनच सुरू होते. तिचा पहिला कलाम 'खुशबु' १९७५ मध्ये प्रकाशित झाला आणि संपूर्ण उर्दू दुनिया अचंबित झाली. हुस्न, इश्क, शबाब यातच गुरफटणार्‍या उर्दू शायरीला परवीनच्या गझलांची नजाकत वेगळीच वाटली. बकौल परवीन-

शौकेरक्स (नृत्याची इच्छा) से जबतक उंगलिया नही खुलती
पांवसे हवाओंकी बेडिया नही खुलती
हुस्नके समझने को इक उम्र चाहिये जाना
दो घडी की चाहत में लडकिया नही खुलती।।
माँ से क्या कहेगी दु:ख हिजका (जुदाई) की खुद पर भी
इतनी छोटी उम्रो में भी बच्चीया नही खुलती।।


स्त्री जीवनाच्या प्रत्येक वळणावर परवीनची शायरी साथ देणारी आहे. स्त्रीचं तारुण्यात पदार्पण होणे, विवाह होणेपासून आई होण्यापर्यंतची दास्तान परवीनने आपल्या गझलांमध्ये मांडली.
प्रेमभावना परवीनने एवढय़ा हळुवार मांडल्या

धनक धनक वो मेरे कर देगा
(इंद्र धनुच्या)
वो लमस (स्पर्श) मेरे बदन को गुलाब कर देगा।।
मै सच कहूँगी मगर फिर भी हार जाउँगी
वो झुठ बोलेगा और लाजवाब कर देगा।।


जीवनात विरह, वेदना, पिडा यांचा सुरेख संगम म्हणजे परवीनची शायरी

बादबा खुलने से पहले का इशारा देखना
मै समन्दर देखती हँू तुम किनारा देखना।।
यु बिछडना भी बहत आसा न था उससे मगर
जाते जाते उसका मुडकर वो दुबारा देखना।।


परवीनच्या नंतर आलेल्या पुस्तकांनी उर्दू जगतामध्ये फार मोठी क्रांती केली. सदबर्ग (१९८0), खुदकलाम (१९९0), इन्कार (१९९0), माहेतमाम (पूर्ण चंद्र) १९९१ ही तिची गझल व कवितांची गाजलेली पुस्तके. यासाठी साहित्य क्षेत्रातील पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्राईड ऑफ परफॉर्मन्स हा पुरस्कार मिळाला. जीवनाच्या प्रत्येक अनुभवाला परवीन शब्दबद्ध करायची.

खुली आंख मे सपना झाकता है
वो सोया है के कुछ कुछ जागता है।।
तेरी चाहत के भीगे जंगल में
मेरा मन मोर बनके नाचता है।।


अशी सहज सुलभ स्त्री भावना व्यक्त करणारी परवीन पुढे म्हणते-

बारिश हुयी तो फुलो के तन चाक हो गये
मौसम के हाथ भीग केसफ्फाक हो गये।।
जुगनू को दिन के वक्त परखने की जिद करे
बच्चे हमारे दौरके चालाक हो गये।।


पाकिस्तानच्या कस्टम खात्यामध्ये कलेक्टरच्या पदावर नोकरीला असणारी परवीन खरेतर सर्व सुखे, ऐश्‍वर्य पायावर लोळण घेत असताना समकालीन शायरांना प्रश्न पडायचा परवीनला काय दु:ख आहे? एवढी गमगीन गझल का लिहते याचे उत्तर खरे तर तिच्या कौटुंबिक आयुष्यात एकटेपणामध्ये असावे. कारण एक मुलगा झाल्यावर केवळ आपल्यापेक्षा परवीन जास्त लोकप्रिय आहे, या अभिमानी पुरुषी स्वभावामुळे तिच्या डॉक्टर नवर्‍याने तिला तलाक दिला आणि परवीन एकटी झाली. ही 'तनहाई' गझल बनून आली.

'शायद उसने मुझको तनहा देख लिया है
दु:ख ने मेरे घर का रस्ता देख लिया है।।
आप अपने से आंख चुनाये फिरती हूँ
आईने में किसका चेहरा देख लिया है।।


आणि शायर एकटा असला तरी मनाने तो कधीच एकटा नसतो. जगाचे दु:ख, लोकांच्या समस्या सातत्याने तो गझलमध्ये मांडत असतो. परवीन एका ठिकाणी म्हणते.

तेरा घर मेरा जंगल भीगता है साथ साथ
ऐसी बरसाते की बादल भीगता है साथ साथ।।
बारिश में भी कितना तनहा मेरा किसान
जिस्म और इकलौता कम्बल भीगता है साथ साथ


प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे सर्मपण स्त्रीचे हे दु:ख तिने गझलमध्ये मांडले.
कमाले जब्त (संयम)को खुद भी तो आज माऊंगी
मै अपने हाथ से उसकी दुल्हन सजाऊंगी
वो क्या गया की रफाकत (दोस्ती) के सारे लुत्फ गये
मै किससे रुठ सकूंगी, किसे मनाऊंगी
परवीन एका कलेक्टरच्या पदावर होती. एक सुंदर स्त्री, एक 'कमाल की शायरा' एक तर पाकिस्तानातसारख्या देशात स्त्री होणं हाच एक अभिशाप. त्यातही असं दृष्ट लागल्यासारखं कर्तृत्व, अशा गझला त्यामुळे पाकिस्तानचा प्रख्यात उर्दू समीक्षक अहमद नदीम कासमीने संशयाचा तीर सोडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: